कॅप्शन – छत्रपती संभाजी महाराज विभागीय क्रीडा संकुल येथे कोल्हापूर महानगरपालिका व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मनपास्तर शासकीय शालेय सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल स्पर्धेला, उत्साहात प्रारंभ झाला.

कोल्हापूर : (लोकमानस न्यूज विशेष प्रतिनिधी – नंदकुमार तेली).
कोल्हापूर महानगरपालिका व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मनपास्तर शासकीय शालेय सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल स्पर्धेला छत्रपती संभाजी महाराज विभागीय क्रीडा संकुल, कोल्हापूर येथे उत्साहात प्रारंभ झाला. स्पर्धेचे उद्घाटन प्राथमिक शिक्षण समितीच्या सभापती तथा नगरसेविका सौ. शिला अशोक सोनुले यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कोल्हापूर सॉकर रेफ्री असोसिएशनचे सचिव प्रदीप साळोखे, क्रीडा निरीक्षक सचिन पांडव, स्पर्धा समन्वयक सुरेश चव्हाण, सिद्धार्थ कुराडे तसेच ज्येष्ठ क्रीडा शिक्षक लहू अंगज उपस्थित होते.
१५ वर्षे मुले गटातील निकाल : (सहभागी २३ शाळा)
पहिल्या सामन्यात छत्रपती शाहू विद्यालय (एसएससी) व प्रायव्हेट हायस्कूल यांच्यातील सामना गोलशून्य बरोबरीत राहिला. ट्रायब्रेकरमध्ये छत्रपती शाहू विद्यालयाने २-१ गोलने विजय मिळविला. दुसऱ्या सामन्यात पोदार स्कूल व संजीवन इंग्लिश स्कूल, कदमवाडी यांच्यातील सामनाही गोलशून्य बरोबरीत राहिला. ट्रायब्रेकरमध्ये पोदार स्कूलने ४-३ असा विजय मिळविला. तिसऱ्या सामन्यात शांतिनिकेतन स्कूल ने प्रिन्स शिवाजी इंग्लिश मीडियम स्कूलवर ३-० गोलने एकतर्फी विजय मिळविला. यामध्ये शांतिनिकेतनकडून चिराग हर्षवर्धन याने २ तर अलोक उरुणकरने १ गोल केला. चौथ्या सामन्यात भारती विद्यापीठ इंग्लिश मीडियम स्कूलने न्यू हायस्कूलवर १-० असा विजय मिळविल. विजयी संघाकडून मयुरेश पाटील याने निर्णायक गोल केला. पाचव्या सामन्यात श्रीमंत माईसाहेब बावडेकर माध्यमिक विद्यालय विरुध्द छत्रपती शाहू विद्यालय (सीबीएसई) यांच्यातील सामना गोलशून्य बरोबरीत राहिला टायब्रेकरवर बावडेकरने ३-१ गोलने विजय मिळविला. सहाव्या सामन्यात छत्रपती शाहू विद्यालय (एसएससी) ने प्रायव्हेट इंग्लिश मीडियम स्कूलवर ३-२ गोलने विजय मिळविला. शाहू विद्यालयाकडून रोनक मुदगल, सुलेख मुल्ला, मयंक गाडगीळ यांनी प्रत्येकी एक गोल करुन संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.

सातव्या सामन्यात पोदार स्कूलने राधाबाई शिंदे ग्लोबल स्कूलवर ३-० गोलने एकतर्फी विजय मिळविला. पोदार स्कूलकडून सूर्यांश पाटील, प्रणव बिराजदार, अनय चव्हाण यांनी प्रत्येकी एक गोल करुन संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. आठव्या सामन्यात शांतिनिकेतन स्कूलने नेहरू हायस्कूलवर ५-० गोलने एकतर्फी विजय मिळविला. शांतिनिकेतनकडून आयुष परमाळे, आरुष ढोबळे, चिराग हर्षवर्धन, चैतन्य बंदिस्ते आणि अर्णव दुर्गावळे यांनी प्रत्येकी एक गोल केला. नवव्या सामन्यात जयभारत हायस्कूल विरुद्ध भारती विद्यापीठ इंग्लिश मीडियम स्कूल यांच्यातील सामना गोलशून्य राहिला. जयभारत हायस्कूलने सडनदेथवर भारती विद्यापीठवर मात केली. दहाव्या सामन्यात श्रीमंत माईसाहेब बावडेकर माध्यमिकने न्यू मॉडेल इंग्लिश मीडियम स्कूलवर ४-० गोलने एकतर्फी मात केली. माईसाहेब बावडेकरकडून श्रीराम पोवार ३ तर दर्शन कांबळेने एक गोल केला. अकराव्या सामन्यात संजीवन इंग्लिश स्कूल रंकाळा विरुद्ध विद्यापीठ हायस्कूल यांच्यातील सामना गोलशून्य बरोबरीत राहिला. टायब्रेकरवर संजीवन स्कूलने ३-२ गोलने विजय मिळविला. बाराव्या सामन्यात सौ. म. लोहिया हायस्कुलने फोर्ट इंटरनॅशनल स्कुलवर ४-० गोलने एकतर्फी विजय संपादन केला. स म लोहियाकडून स्वयम जाधव २, साई पवार, अन्वित चव्हाण प्रत्येकी एक गोल केला. तेराव्या सामन्यात महाराष्ट्र हायस्कूलने न्यू इंग्लिश मीडियम स्कूल संभाजीनगर २-० महाराष्ट्रकडून श्लोक जाधव २ गोल केला.
Our Visitor
Views Last 30 days : 83
Total views : 548754