केवळ घोषणा नव्हे, तर उत्तरदायित्वाची गरज

ब्राह्मण गोलमेज परिषदेतील सूर; समाजहिताच्या प्रश्नांवर चर्चा,  ठराव

फोटो ओळ : आंतरराष्ट्रीय ब्राह्मण परिषदेतर्फे शनिवारी झालेल्या तिसऱ्या ब्राह्मण गोलमेज परिषदेचे उद्घाटन करताना मकरंद कुलकर्णी, शेजारी यशवंत कुलकर्णी, प्रदीप अष्टेकर, मिलिंद संपगावकर, अॅड. मंदार जोशी, अजित देशपांडे, सुरेश मुळे आदि उपस्थित.

कोल्हापूर :  (लोकमान्य विशेष प्रतिनिधी – नंदकुमार तेली).

ब्राह्मण समाजाच्या प्रश्नांवर शासनाने केवळ चर्चा न करता, ठोस निर्णय आणि त्याची अंमलबजावणी करावी, केवळ घोषणा नव्हे, तर उत्तरदायित्वाची गरज आहे. असा सूर आज येथे झालेल्या तिसऱ्या ब्राह्मण गोलमेज परिषदेत उमटला. परिषदेत परशुराम आर्थिक विकास महामंडळाची घोषणा झाल्यानंतर समाजात अपेक्षा निर्माण झाल्या; परंत आजही महामंडळाचा पूर्ण आकृतीबंध, पुरेसा निधी, सक्षम प्रशासकीय व्यवस्था, नियमित कार्यालयीन कामकाज आणि पारदर्शक पदभरती याबरोबरच अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत. अमृत योजनेचे कामकाजही असमाधानकारक आहे, आदी समाजहिताच्या प्रश्नांवर चर्चा, ठराव आणि काही मागण्या करण्यात आल्या.

आंतरराष्ट्रीय ब्राह्मण परिषदेचे व अमृत सेलचे राज्यप्रमुख, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते मकरंद कुलकर्णी यांच्या हस्ते परिषदेचेे उद्घाटन झाले. यावेळी निखिल लातूरकर, अॅड. मंदार जोशी, मिलिंद संपगावकर, सुरेश मुळे, गणेश लंके, अतुल जोशी, राजेंद्र पोतदार, अजित देशपांडे, प्रदीप अष्टेकर, सूरज कुलकर्णी, कमलाकर देशपांडे आदी उपस्थित होते.

ब्राह्मण समाजाला आश्वासनांच्या टाळ्या नकोत, उत्तरदायित्वाची खात्री हवी आहे. आमची भूमिका कोणत्याही व्यक्तिविरोधात नाही, तर समाजहिताच्या प्रश्नांवर परिणामकारक व्यवस्था उभी राहावी, ही आहे. जिथे चांगले काम होईल, तिथे स्वागत करू, पण जिथे प्रश्न उपस्थित होतात, तिथे मौन बाळगणार नाही. समाजाच्या अपेक्षांना न्याय मिळेपर्यंत पाठपुरावा सुरू राहील.

– मकरंद कुलकर्णी

परिषदेतील ठराव असे, प्रमुख मागण्या

गुणवत्तापूर्ण शिक्षण, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, शिष्यवृत्ती आणि कौशल्य विकासासाठी उपक्रम राबविणे

‘अमृत’ संस्थेच्या कारभारावर लक्ष ठेवणे, समाजाचा लाभ होईल, असा निर्णय घेणे.

• तरुणांना रोजगार, उद्योजकता, स्टार्ट-अप आणि आर्थिक मदतीसाठी संधी देणे.

• परशुराम महामंडळाकडून गरजूंना लाभ मिळवून देणे.
• महामंडळाच्या कारभाराबाबत सरकारकडे पाठपुरावा

■ समाजाच्या प्रश्नांवर कायदेशीर मदत आणि प्रभावी पाठपुरावा करणे

राज्यव्यापी, जिल्हा, तालुका आणि शहरस्तरावर समन्वयाची मजबूत रचना करणे

■ संशोधन, संस्कृती संवर्धन, संशोधन, युवा नेतृत्व, समाजाच्या विषयांवर काम करणे

• परशुराम महामंडळ पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करा ‘अमृत’च्या कामकाजात पारदर्शकता आणावी
• शिक्षण, रोजगार आणि उद्योगासाठी शासनाने कृती आराखडा जाहीर करावा
■ समाजाच्या संवादासाठी समन्वय यंत्रणा करावी
■ सर्व विषयांवर कालबद्ध अंमलबजावणीचा शासकीय आराखडा जाहीर करावा.

Our Visitor

5 4 8 4 7 8
Views Last 30 days : 83
Total views : 548754

You may also like

error: Content is protected !!