हिमोफिलिया रुग्णासाठी ऐतिहासिक यशस्वी कामगिरी

- सीपीआरच्या तज्ज्ञ व टीमचे जोखमीची शस्त्रक्रियेच्या यशामध्ये महत्त्वपूर्ण योगदान

 

कोल्हापूर : (लोकमानस न्यूज विशेष प्रतिनिधी नंदकुमार तेली).

गंभीर हिमोफिलिया – ए तसेच रेट्रोव्हायरल पॉझिटिव्ह असलेल्या ६० वर्षीय रुग्णाला (रा. मालेगाव नाशिक) दीड वर्षांपूर्वी मांडीच्या हाडाच्या बॉलचे (फ्रॅक्चर नेक फेम्युर) फ्रॅक्चर झाले होते. हिमोफिलियामुळे होणाऱ्या रक्तस्त्रावाच्या उच्च जोखमीमुळे तसेच आरव्हीडी पॉझिटिव्ह असल्याने शस्त्रक्रिया करताना सर्जनला संसर्गाचा सम्भाव्य धोका लक्षात घेता. नाशिक, पुणे या ठिकाणी सल्लामसलत करूनही शस्त्रक्रिया होऊ शकली नव्हती. ती जोखमीची शस्त्रक्रिया सीपीआरच्या तज्ज्ञ व टीमने यशस्वी पार पाडून ऐतिहासिक कामगिरी बजावली आहे.
आरसीएसएम शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सीपीआर मध्ये रुग्णाची सखोल तपासणी करण्यात आली. इनबिटर चाचणी सामान्य असल्याची खात्री करून योग्य फ्रॅक्चर रिप्लेसमेंट थेरपीच्या सहाय्याने बिपलोर हिप रिप्लेसमेंट शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या करण्यात आली . विशेष बाब म्हणजे शस्त्रक्रियेनंतर दुसऱ्याच दिवशी रुग्णाला स्वतः चालणे शक्य झाले. तब्बल दीड वर्षानंतर रुग्ण पहिल्यांदा चालला .


तज्ज्ञ व टीमचे यशामध्ये महत्त्वपूर्ण योगदान
हिमॅटोलॉजिस्ट व हिमोफिलिया तज्ज्ञ डॉ. वरुण बाफना , अस्थिरोग तज्ज्ञ डॉ. सोहेल जमादार , विभागप्रमुख डॉ परितेकर , डॉ प्रा बर्गे , मेडिसन विभाग डॉ प्रा विद्या पाटील, सहयोगी प्राध्यापक अस्थिरोग विभाग डॉ राहुल बड़े विभागप्रमुख, डॉ कौस्तुभ गाटे, भूलतज्ज्ञ डॉ श्रीगणेश कामत, तेजस्वी महिंद, डॉ फातिमा , विभागप्रमुख डॉ उल्हास मिसाळ , नर्सिंग स्टाफ सूरज, निवासी डॉक्टर डॉ विकास ,डॉ निषाद, फिजिओथेरपी व इतर सहाय्यक कर्मचारी आदींचा समावेश होता वरील टीमला अधिष्ठाता डॉ सदानंद भिसे , अधीक्षक डॉ भूषण मिरजे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले .

Our Visitor

5 4 8 4 3 0
Views Last 30 days : 367
Total views : 548648

You may also like

error: Content is protected !!