कोल्हापूर : लोकमानस न्यूज – विशेष प्रतिनिधी नंदकुमार तेली.
जागतिक सर्जन दिन १५ जून रोजी साजरा करण्यात येतो या दिनानिमित्त असोसिएशन ऑफ सर्जन्स ऑफ इंडिया (एएसआय)तर्फे दि ८ जून ते १५ जून २०२६ या कालावधीत देशभरात “सर्जन्स वीक” साजरा करण्यात येत आहे. याअंतर्गत कोल्हापूर सर्जिकल सोसायटी (केएसएस), सिटी चॅप्टर ऑफ एएसआयतर्फे विविध सामाजिक शैक्षणिक व जनजागृतीपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे., अशी माहिती संघटनेचे अध्यक्ष डॉ. सागर कुरुणकर यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. या पत्रकार परिषदेस सचिव डॉ.मधुर जोशी, खजानिस डॉ. सत्येंद्र ठोंबरे उपस्थित होते.
यावेळी डॉ. सागर कुरुणकर म्हणाले, सर्जन्स वीकला दि ८ जून रोजीपासून शानदार प्रारंभ झाला. पहिल्या दिवशी सकाळी ११ वाजता “डायबेटिक फूट” या विषयावर जनजागृतीपर डॉ. भूषण शिंदे व डॉ. प्रशांत चौधरी यांनी मार्गदर्शन केले. दि ९ जून रोजी सकाळी ७ वाजता राजाराम तलाव परिसरात वृक्षारोपण उपक्रम, दुपारी १ वाजता डॉ. डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेज येथे कर्करोग जनजागृतीपर कार्यक्रमात डॉ. हर्षवर्धन पोखरकर मार्गदर्शन करणार आहेत. दि १० जून रोजी सकाळी ९ वाजता डॉ. डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेज येथे रक्तदान सप्ताहाचे उपक्रमाचे आयोजन केले आहे. दि ११ जून रोजी शाहूपुरी येथील सर्वोदय हॉस्पिटलमध्ये डॉ. सागर कुरणकर यांच्या मार्गदर्शनाखाली फॅटी लिव्हर रुग्णांसाठी मोफत फायब्रो स्कॅन तपासणी करण्यात येणार आहे.
पुढे डॉ. कुरुणकर म्हणाले, दि १२ जून रोजी डॉ. डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेज येथे सर्जिकल स्टेपलिंग कार्यक्रम होणार आहे. दि १३ जून रोजी “सोशल सिक्युरिटी स्कीम फॉर सर्जन्स” या विषयावर सकाळी १० वाजता डॉ. प्रतापसिंह वरुटे यांचे तर दि १४ जून रोजी “हेल्दी सर्जन हेल्दी नेशन” या विषयावर सकाळी १० वाजता डॉ. आनंद कामत मार्गदर्शन करणार आहेत. डी वाय पाटील मेडिकल कॉलेज येथे ही दोन्ही व्याख्याने होणार आहेत. या सर्व कार्यक्रमांद्वारे नागरिकांमध्ये आरोग्यविषयक जागरूकता निर्माण करणे, सामाजिक बांधिलकी जपणे तसेच सर्जन्सच्या व्यावसायिक विकासाला चालना देणे हा उद्देश आहे. वैद्यकीय क्षेत्रातील व्यावसायिक तसेच नागरिकांनी या उपक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहनही यावेळी त्यांनी केले.
Our Visitor
Views Last 30 days : 83
Total views : 548754