दिलबहारची उपांत्यफेरीत धडक

- राजेश चषक फुटबॉल स्पर्धा - दिलबहारची संयुक्त जुना बुधवारवर २-० गोलने मात.- दरम्यान, सोमवारी झालेल्या सामन्यात पाटाकडील तालीम मंडळ "अ" संघाने उत्तरेश्वर प्रासादिक वाघाची तालीम संघावर २-० गोलने मात करुन उपांत्यफेरीत प्रवेश केला. - दरम्यान, सोमवारी झालेल्या सामन्यात पाटाकडील तालीम मंडळ "अ" संघाने उत्तरेश्वर प्रासादिक वाघाची तालीम संघावर २-० गोलने मात करुन उपांत्यफेरीत प्रवेश केला

कोल्हापूर : लोकमानस न्यूज (विशेष प्रतिनिधी नंदकुमार तेली)
छत्रपती शाहू स्टेडियम मैदानावर सुरू असलेल्या राजेश चषक फुटबॉल स्पर्धेत मंगळवारी झालेल्या सामन्यांमध्ये दिलबहार तालीम मंडळने संयुक्त जुना बुधवार पेठवर २-० गोल ने मात केली. या विजयाबरोबर दिलबहारने उपांत्य फेरीत धडक मारली.

संयुक्त जुना बुधवार विरुद्ध दिलबर तालीम मंडळ यांच्यातील सामन्याचा एक क्षण. (छाया – नाज आत्तार).
सामनावीर दिलबहारचा आघाडीफळीतील खेळाडू स्वयंम साळोखे याला बहाल करण्यात आला.
सामन्याच्या सुरुवातीपासूनच संयुक्त जुना बुधवार व दिलबहारने आक्रमक खेळाचे धोरण अवलंबले. दोन्हीही संघातील खेळाडूंनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन घडवत प्रतिस्पर्धी संघांवर गोल करण्याचे प्रयत्न केले. मात्र, गोल न करता आल्याने पूर्वार्धात सामना गोलशून्य बरोबरीत राहिला .
उत्तरार्धात दिलबहारच्या आघाडी फळीतील खेळाडूंनी वेगवान चाली रजत बुधवार पेठ संघावर खोलवर चढाई केली. सामन्याच्या ४८ व्या मिनिटाला थुलुंगाच्या पासवर स्वयंम साळोखेने मैदानी गोल करून दिलबहार संघाला १-० गोलची आघाडी मिळवून दिली. बुधवार पेठ संघाकडून मयूर सुतार संकेत कांबळे प्रथमेश जाधव सचिन भोरे शुभम जाधव प्रसाद सरनाईक यांनी गोल आघाडी कमी करण्यासाठी केलेले अनेक प्रयत्न दिलबहारच्या बचावफळीने फोल ठरवले. सामना अखेरच्या मिनिटापर्यंत रंगतदार झाला. सामन्यात ८० व्या मिनिटाला बुधवार पेठच्या संकेत जाधवने दिलबहारच्या आघाडीफळीतील खेळाडू थुलुंगाला गोल एरियात धोकादायक रित्या अडविले याबद्दल दिलबहारला पेनल्टी देण्यात आली. मिळालेल्या संधीचा फायदा उठवत थुलुंगाने पेनल्टीचे गोलमध्ये रुपांतर करून संघाला २-० गोलची आघाडी मिळवून दिली. दिलबहारकडून प्रीतम भोसले, थुलुंगा, सार्थक मगदूम, संकेत वेसणेकर, स्वयं साळोखे यांनी चांगल्या खेळाचे प्रदर्शन करून संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. सामना दिलबहार संघाने २-० गोलने जिंकला.
पीटीएमची उत्तरेश्वरवर २-० गोलने मात
दरम्यान, छत्रपती शाहू स्टेडियमवर सुरू असलेल्या राजेश चषक फुटबॉल स्पर्धेत सोमवारी झालेल्या सामन्यांमध्ये पाटाकडील तालीम मंडळ “अ” संघाने उत्तरेश्वर प्रासादिक वाघाची तालीम संघावर २-० गोलने मात केली.
या विजयाबरोबर पीटीएम संघाने उपांत्य फेरीत धडक मारली. सामनावीरचा बहुमान ऋषिकेश मेथे – पाटील याला बहाल करण्यात आला.
सामन्याच्या सुरुवातीपासूनच पीटीएम संघाने वेगवान खेळायला सुरुवात केली. सामन्याच्या ३० व्या मिनिटाला पीटीएमच्या नभी खानने दिलेल्या उत्कृष्ट पासवर्ड ऋषिकेश मेथे – पाटील गोल नोंदवून संघाला १ गोल ची आघाडी मिळवून दिली. यानंतर ८ मिनिटाच्या अंतराने सामन्याच्या ३८ व्या मिनिटाला यशराज कांबळेच्या पासवर ओंकार मोरेने गोल करून संघाला २-० गोलची आघाडी मिळवून दिली. पूर्वार्धात पीटीएम संघाने २-० गोलची आघाडी कायम ठेवली.
उत्तरार्धात गोल आघाडी कमी करण्याच्या इराद्याने उतरलेल्या उत्तरेश्वर संघाने आक्रमक खेळाला प्रारंभ केला. उत्तरेश्वरकडून अथर्व पाटील, मयूर कदम, विश्वदीप भोसले, तुषार पुनोळकर, अजहर मोमीन यांनी चांगल्या खेळाचे प्रदर्शन घडवत गोल करण्याचे प्रयत्न केले. मात्र, पीटीएम संघाच्या बचाव फळीने त्यांचे प्रयत्न उधळून लावले. सामना पीटीएम संघाने २-० गोलने जिंकला.

चौकटी –

– दोन येलो रेड कार्ड

संयुक्त जुना बुधवार पेठ संघाचा खेळाडू संकेत जाधव ला दोन येलो कार्ड देण्यात आल्याने
रेड कार्ड दाखवण्यात आले.

– १ हजार रुपयांचा दंड

२८ फेब्रुवारी रोजी झालेल्या शिवाजी तरुण मंडळ विरुद्ध रंकाळा तालीम मंडळ सामन्यावेळी ऑफिशियलमध्ये शूज न घालण्याचा नियम भंग केल्याबद्दल केएसएने संबंधितावर १ हजार रुपयांचा दंड केला.

आजचा सामना –

दु. ४ वा. – श्री शिवाजी तरुण मंडळ विरुद्ध प्रॅक्टिस फुटबॉल क्लब.

Our Visitor

5 4 8 4 3 0
Views Last 30 days : 367
Total views : 548648

You may also like

error: Content is protected !!