पंचगंगा स्मशानभूमीस “८८ हजार शेणी दान”

- स्वर्गीय श्री.विनायकराव क्षीरसागर यांच्या उत्तरकार्य दिनी शिवसेनेकडून महापालिका प्रशासनाकडे सुपूर्द

पंचगंगा स्मशानभूमीस “८८ हजार शेणी दान”
– स्वर्गीय श्री.विनायकराव क्षीरसागर यांच्या उत्तरकार्य दिनी शिवसेनेकडून महापालिका प्रशासनाकडे सुपूर्द

कोल्हापूर ( दि.०४) : (“लोकमानस न्यूज 4” -विशेष प्रतिनिधी).

राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांचे वडील स्वर्गीय विनायकराव श्रीपतराव क्षीरसागर (माजी अध्यक्ष, कोल्हापूर जिल्हा बेकर्स असोसिएशन) यांना वयाच्या ८८ व्या वर्षी देवाज्ञा झाली. त्यांच्या उत्तरकार्य दिनी सामाजिक कार्यातून आदरांजली वाहण्यासाठी शिवसेनेच्यावतीने कोल्हापूर महानगरपालिकेच्या पंचगंगा स्मशानभूमीस ८८ हजार शेणींचे दान करण्यात आले.


यावेळी बोलताना जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण यांनी, स्वर्गीय विनायकराव क्षीरसागर यांना भावपूर्ण श्रधांजली अर्पण करीत, क्षीरसागर कुटुंबियांच्या दु:खात शिवसेना परिवार सहभागी आहे. शिवसेनेने नेहमीच समाजकार्याला अग्रस्थान दिले आहे. दु:खाच्या प्रसंगातही सामाजिक भावना जपावी या हेतून स्वर्गीय विनायकराव क्षीरसागर यांच्या स्मृतींना आदरांजली वाहण्यासाठी शिवसेनेकडून कोल्हापूर महानगरपालिका पंचगंगा स्मशानभूमीस ८८ हजार शेणींचे दान करण्यात येत असल्याचे सांगितले. यानंतर शिवसेनेकडून महापालिका शहर अभियंता नेत्रदिप सरनोबत यांच्या उपस्थितीत ८८ हजार शेणी कोल्हापूर महानगरपालिका प्रशासनाकडे सुपूर्द केल्या.

यावेळी शिवसेना शहरप्रमुख रणजीत जाधव, उपजिल्हाप्रमुख उदय भोसले, उपजिल्हाप्रमुख तुकाराम साळोखे, उपजिल्हाप्रमुख किशोर घाटगे, अनुसूचित जाती जमाती जिल्हाप्रमुख निलेश हंकारे, उपशहरप्रमुख सुरेश माने, कपिल नाळे, रणजीत मंडलिक. सम्राट यादव, विनायक जाधव, युवासेना संपर्क अधिकारी प्रसाद चव्हाण, रोहन शिंदे, उदय पोतदार, संतोष दिंडे, अभिलाष चव्हाण, ओम कांबळे आदी शिवसेना पदाधिकारी, महानगरपालिका कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Our Visitor

5 4 8 4 3 0
Views Last 30 days : 367
Total views : 548648

You may also like

error: Content is protected !!