फोटो ओळी : तांदळाच्या उकडी पासून बनवलेली देवीची आकर्षक उभी मूर्ती. तसेच फेर धरून घागर फुंकणाऱ्या महिला.
कोल्हापूर : (लोकमानस न्यूज – विशेष प्रतिनिधी नंदकुमार तेली).
मंगलधाम हॉल येथे कोल्हापूर चित्पावन संघातर्फे आयोजित श्री महालक्ष्मी अष्टमी जागर सोहळा रविवारी उत्साहात पार पडला. या सोहळ्यात हजारो भाविकांनी सहभागी होउन देवीच्या दर्शनाचा लाभ घेतला.

फोटो ओळी : तांदळाच्या उकडी पासून बनवलेली देवीची आकर्षक उभी मूर्ती. तसेच फेर धरून घागर फुंकणाऱ्या महिला.
या अंतर्गत सकाळी नवरात्र उत्सवानिमित्त धार्मिक विधी संपन्न झाले. यामध्ये श्री पूजा, तुलसी पूजन, आरती,दुपारी महाप्रसाद झाला. तर सायंकाळी सात नंतर तांदळाच्या उकडीपासून बनवलेल्या मुखवट्याची देवी उभी करून दर्शन पूजा पठण व नैवेद्य झाला.त्यानंतर महिलांनी एकत्र येऊन घागरी फुंकण्याबरोबर पारंपारिक गीते सादर केली. तसेच चित्पावन महिला मंडळाच्या वतीने खास देवीच्या देवीच्या गाण्यांवरती टिपऱ्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम मंगलमय व भक्तीमय वातावरणात संपन्न झाला. हजारो भाविकांनी या सोहळ्यात सहभागी होउन देवीच्या दर्शनाचा लाभ घेतला.

रात्री उशिरापर्यंत देवीचा जागर सुरू होता. तसेच भक्तांची मोठी गर्दी झाली होती. कार्यक्रमास अध्यक्ष मकरंद करंदीकर, उपाध्यक्ष प्रसाद भिडे, सचिव केदार जोशी, माधुरी करंदीकर, अश्विनी भिडे, संगीता आपटे, सीमा गोखले, पंकजा गोरे, दत्तात्रय आपटे, शुभम साने, संतोष साने, किरण जोशी, ऋषिकेश लिमये, श्रीकांत लिमये, निखिल गोखले आदी समाजबांधव माेठ्या संख्येने उपस्थित होते.
लोकमानस न्यूज व्यवस्थापकीय संपादक स्वरूप तेली.
न्यूज व जाहिरातीसाठी संपर्क – 97 67 38 40 91. / 98 60 28 22 89.
Our Visitor
Views Last 30 days : 65
Total views : 549013