– सामन्यात सुदिक्षा देसाई च्या नाबाद ४४ धावा
कोल्हापूर : लोकमानस न्यूज – निखिल तेली.
शाहूपूरी जिमखाना मैदान येथे सुरु असलेल्या कोल्हापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने व श्री हंबीरराव रंगराव पाटील(बापू) पुरस्कॄत “लक्ष्मी रंगराव कंरडक” महिला एकदिवशीय क्रिकेट स्पर्धेत बुधवारी झालेल्या दुसऱ्या उपांत्य सामन्यात महाराणी लक्ष्मीबाई कर्तबगार महिला संघाने महाराणी ताराराणी महिला संघावर ५ विकेटनी मात करुन अंतिम फेरीत धडक मारली. शाहूपूरी जिमखाना मैदान येथे अंतीम सामना उद्या गुरुवार दि ११ रोजी महाराणी प्रमिलाराजे महिला संघ विरूध्द महाराणी लक्ष्मीबाई कर्तबगार महिला संघ यांच्यात होणार आहे.

महाराणी लक्ष्मीबाई कर्तबगार महिला संघ विरूध्द महाराणी ताराराणी महिला संघ
प्रथम फलदांजी करताना महाराणी ताराराणी महिला संघाने ३३.४ षटकांत सर्वबाद फक्त ८३ धावा केल्या. यामध्ये वैद्यही जाधव व संजना वाघमोडे प्रत्येकी १७ धावा केल्या. महाराणी लक्ष्मीबाई कर्तबगार महिला संघाकडुन सॄष्टी पोवार, प्राजंल चौगुले व ऋतुजा खड्ड यांनी प्रत्येकी २, सुदिक्षा देसाई उत्कर्षा जाधव, संस्कॄती सणगर व स्वरा भांबुरे यांनी प्रत्येकी १ बळी घेतला. उत्तरादाखल खेळताना महाराणी लक्ष्मीबाई कर्तबगार महिला संघाने २५.१ षटकांत ५ बाद ८७ धावा केल्या. यामध्ये सुदिक्षा देसाई नाबाद ४०, उत्कर्षा जाधव २२ धावा केल्या. महाराणी ताराराणी महिला संघाकडुन बळी पवित्रा महाडीकने २, स्वरा यवलुस्कर, पुर्वा जाधव व मिसबा सय्यद यांनी प्रत्येकी १ बळी घेतला. अशा प्रकारे महाराणी लक्ष्मीबाई कर्तबगार महिला संघाने ५ विकेटनी विजय संपादन करत अंतीम फेरीत प्रवेश केला.
Our Visitor
Views Last 30 days : 367
Total views : 548648