मनपा जिममध्ये घडतायेत राष्ट्रीय शरीरसौष्ठवपटू..!

- कसबा बावड्यातील अद्यावत सतेज जिम्नॅशियममधील व्यायामशाळेची यशस्वी जडणघडण. - अत्यल्प फी व प्रशिक्षण, आहारासंदर्भात माेफत मार्गदर्शन. - अद्यावत व्यायामशाळेसाठी २० लाखांचा निधी - सहा राष्ट्रीय खेळाडू घडविले असून यातील चार खेळाडूंची भारत श्री स्पर्धेसाठी निवड.

कोल्हापूर : लोकमानस न्यूज – विशेष प्रतिनिधी नंदकुमार तेली.

कसबा बावड्यातील मनपा सतेज जिम्नॅशियमच्या अद्यावत व्यायामशाळेत तज्ज्ञ प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली दर्जेदार राष्ट्रीय खेळाडू घडत आहेत. सहा खेळाडूंनी राष्ट्रीय शरीरसौष्ठव स्पर्धा गाजविल्या असून चार खेळाडूंची ऑगस्टमध्ये बेंगलोर येथे होणाऱ्या भारत श्री स्पर्धेसाठी निवड झाली आहे. व्यायामशाळेची यशस्वी जडणघडण अद्यावत जिमपर्यंत झाली आहे. या व्यायामशाळेत अत्यल्प फीमध्ये सर्वसामान्य खेळाडूंना प्रशिक्षण, आहारासंदर्भात मोफत मार्गदर्शन केले जाते.
अत्यल्प फी व प्रशिक्षण, आहारासंदर्भात मोफत मार्गदर्शन
जिम पहाटे ५ ते ९ तर दुपारी ४ ते ९ यावेळेत सुरु असते. व्यायामशाळेत शिस्तबध्दतेला महत्व आहे. अत्यल्प अशा प्रतिमहिना २०० रुपयांची फी आकारण्यात येते. यात प्रशिक्षण, आहारासंदर्भात मोफत मार्गदर्शन केले जाते. तसेच जिममध्ये हनुमान, साईबाबा यांचे मंदिर असून याची नित्यनियमाने पुजा अर्चा केली जाते. जिमतर्फे युगपुरुषांच्या जयंतीचे औचित्य साधून व्यसनमुक्ती उपक्रमही राबविला जातो. तुलनेत खासगी जिमचे वर्षाला १५ ते १८ हजारांचे पॅकेज असते तर प्रशिक्षण फी व आहारासंदर्भात मार्गदर्शन फी वेगळी घेतली जातेण
५ वेळा मिस्टर इंडिया स्पर्धा क्वालिफाईड
मनपाच्या या जिममध्ये प्रशिक्षक म्हणून राजू कवाळे हे ५ वेळा मिस्टर इंडिया शरीरसौष्ठपटू स्पर्धेसाठी क्वालिफाईड झाले आहेत. तर सिनिअर डिस्ट्रीक्ट स्पर्धेत सिल्व्हर मेडलची कमाई केली आहे. व्यायामशाळेतील खेळाडूंना प्रशिक्षण, आहारासंदर्भात मार्गदर्शन मोफत देण्याचे कार्य सुरु ठेवले आहे.
चार खेळाडूंची भारत श्री स्पर्धेसाठी निवड
नवी मुंबई येथे झालेल्या महाराष्ट्र श्री सिनिअर व ज्युनिअर स्पर्धेत या व्यायामशाळेच्या चार शरीरसौष्ठवपटूंनी सुवर्ण कामगिरी केली. यामध्ये अभिषेक सोनुले, प्रशांत केंबळे, जय डावर, संकेत दादाघोळ यांचा समावेश आहे. त्यांची बेंगलोर येथे होणाऱ्या भारत श्री स्पर्धेसाठी निवड झाली आहे. तर सार्थक देसाईने राष्ट्रीय स्पर्धेत सहभाग नोंदविला आहे.


जिम अद्यावतसाठी २० लाखांचा निधी
या जिमने १५ वर्षांपूर्वीच कात टाकली आहे. जिम ओपनिंगवेळी १० लाखांचा निधी तर सध्या इमारत डागडुजी, व्यायामशाळेतील हार्ड कोअर मशिन, डंबेल्स, प्लेट, बार, अद्ययावत साहित्य, रंगकाम, विद्युत सुविधा, रबरचे हार्डकोर मॅट आदींसाठी १० लाख असा एकुण २० लाखांचा निधी आमदार सतेज पाटील यांच्या फंडातून मिळाला आहे तसेच जिम व खेळाडूंसाठी माजी आमदार ऋतुराज पाटील, माजी नगरसेवक अजित पोवार, धामोडकर काँग्रेसचे शहर अध्यक्ष प्रविण केसरकर यांचेही सहकार्य व प्रोत्साहन लाभत आहे .

Our Visitor

5 4 8 4 3 0
Views Last 30 days : 367
Total views : 548648

You may also like

error: Content is protected !!