गार्डन क्लबतर्फे भव्य पुष्पप्रदर्शन…!

– गार्डन क्लबच्या अध्यक्षा कल्पना सावंत यांची माहिती

– दि १७ व १८ डिसेंबर 2022 रोजी होणार प्रदर्शन

कोल्हापूर : (“मानस न्युज 9” – विशेष प्रतिनिधी स्वरूप तेली)

महावीर उद्यानामध्ये कोल्हापूर महानगरपालिका व गार्डन क्लब कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमानाने दि. १७ व १८ डिसेंबर 2022 रोजी “भव्य पुष्प प्रदर्शना”चे आयोजन करण्यात आले आहे., अशी माहिती गार्डन क्लबच्या अध्यक्षा कल्पना सावंत यांनी पत्रकार परिषदेत दिली.

या पत्रकार परिषदेला गार्डन क्लबचे उपाध्यक्ष शशिकांत कदम, वर्षा वायचळ, महापालिका अधिकारी, प्रभारी उद्यान अधीक्षक समीर व्याघ्र्यांबरे, सहाय्यक उद्यान अधिकारी राम चव्हाण, शांतीदेवी पाटील, डॉ. अल्पना चौगुले, जयश्री कजारीया,शैला निकम,संगीता कोकितकर, रविंद्र साळुंखे आदी उपस्थित होते.

– निसर्गप्रेमींना उत्कंठा..!

कोरोनाच्या निर्बंधामुळे मागील दोन वर्ष गार्डन क्लबचे पुष्पप्रदर्शन मर्यादित स्वरूपात झाले होते. यामुळे पश्चिम महाराष्ट्रामध्ये गार्डन क्लबच्या या सुप्रसिद्ध पुष्प प्रदर्शन केंव्हा सुरू होणार याची उत्कंठा निसर्गप्रेमींना लागून राहिली आहे.

– पुष्पप्रदर्शनचे ५२ वे वर्ष

यंदाच्या वर्षी गार्डन क्लबचे ५२ वे पुष्पप्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या पुष्पप्रदर्शनाबरोबरच विविध स्पर्धांचे आयोजन केलेले आहे. यामध्ये गुलाब आणि विविध प्रकारची फुले, पुष्परचना, कुंडीतील रोपे, फुले, पाने व पाकळ्यांची रांगोळी, बुके, सॅलड डेकोरेशन, बोनसाय, मुक्त रचना, लैंडस्केपिंग आदींचा समावेश आहे.

– प्रदर्शनाचा लाभ निसर्गप्रेमी व रसिकांनी घ्यावा

या प्रदर्शनाचे उद्घाटन शनिवार दि. १७ डिसेंबर २०२२ रोजी सकाळी अकरा वाजता कोल्हापूर महानगरपालिका प्रशासक डॉ.सौ. कादंबरी बलकवडे यांच्या अध्यक्षतेखाली व उद्योगपती सचिन शिरगावकर, सौ शांतादेवी डी. पाटील व मौर्या ग्रुपचे मंगेश पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. सायंकाळी पाच वाजता तरुणाईचे आकर्षण असलेला लाईट्स व डीजे संगीताच्या साथीने होणारा “बॉटनिकल फॅशन शो” मराठी अभिनेते विराट मडके यांच्या उपस्थितीत होणार आहे. या बॉटनिकल फॅशनशोसाठी निसर्गातील पाना फुलांचा वापर करून विविध महाविद्यालयातील युवक युवती भाग घेणार आहेत. रविवार दिनांक १८ डिसेंबर रोजी सकाळी नऊ वाजता चित्रकला स्पर्धेचे आयोजन केले आहे. फुलबाग, फुले व बुके या विषयावर आधारित ही स्पर्धा आयोजित केली असून त्यासाठी इ. पहिली ते इ. तिसरी, इ. चौथी ते इ.सातवी, इ. आठवी ते इ. दहावी (खुला गट) अशी गट विभागणी केली आहे. सायंकाळी पाच वाजता विविध स्पर्धातील विजेत्या स्पर्धकांना बक्षीस वितरण समारंभ संयुक्त आयुक्त राज्य जीएसटी सुनीता थोरात यांच्या हस्ते व आर. एल. तावडे फाउंडेशनच्या अध्यक्षा सौ. शोभा तावडे यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. हे सर्व कार्यक्रम महावीर उद्यानात होणार असून या फ्लॉवर शोच्या निमित्ताने बागेसंबंधी विविध वस्तूंचे स्टॉल तसेच खाद्यवस्तुंचे स्टॉल असणार आहेत. या प्रदर्शनाचा लाभ निसर्गप्रेमी व रसिकांनी घ्यावा., असे आवाहन संयोजकांनी केले आहे.

Our Visitor

5 4 8 0 5 2
Views Last 30 days : 134
Total views : 548109

You may also like

error: Content is protected !!