कोल्हापूर : (लोकमानस न्यूज – विशेष प्रतिनिधी नंदकुमार तेली).
छत्रपती संभाजी महाराज विभागीय क्रीडा संकुलच्या मैदानावर सुरु असलेल्या कोल्हापूर महानगरपालिका व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आयोजित सेवा संकल्प अभियान अंतर्गत मनपास्तर शासकीय शालेय खो खो १४ वर्षाखालील मुले गटातील स्पर्धेत बुधवारी अत्यंत चुरशीच्या झालेल्या अंतिम सामन्यात कोरगावकर हायस्कूलने श्री वसंतराव जयवंतराव देशमुख हायस्कूलवर एका गुणाने मात करुन अजिंक्यपद पटकविले.
सामन्यांचा सविस्तर निकाल पुढीलप्रमाणे, अंतिम सामन्यात कोरगावकर हायस्कूलने श्री वसंतराव जयवंतराव देशमुख हायस्कूलवर ६-५ अशा अवघ्या एका गुणफरकाने मात करुन अजिंक्यपद पटकविले.

विजयी कोरगावकर हायस्कूल संघ : अनिश नायकवडी, विराज कांबळे, श्लोक इंगळे, अथर्वराज इनामदार, समर्थ शिंदे, रोहित साळवे, यासिन पटवेगार, कुशल दुधाळ, कार्तिक रस्ते, कार्तिक चौगुले, उद्देश चौगुले, आदर्श कांबळे, आरुष आवळे, आयान बेपारी, चैतन्य कांबळे, क्रीडा शिक्षक सदाशिव -हाटवळ, इंद्रायणी पाटील.
तत्पूर्वी, झालेल्या पहिल्या उपांत्य सामन्यात कोरगावकर हायस्कूलने राजश्री शाहू हायस्कूल रिंग रोडवर ५-३ अशा अवघ्या दोन गुणफरकाने मात केली. तर दुसऱ्या उपांत्य सामन्यात श्री वसंतराव जयवंतराव देशमुख हायस्कूलने मनपा टेंबलाईवाडी विद्यामंदिरवर ११-५ अशा सहा गुणफरकाने विजय संपादन केला. दोन्ही विजयी संघांनी अंतिम फेरीत धडक मारली. तसेच तिसऱ्या क्रमांकासाठी झालेल्या सामन्यात राजश्री शाहू हायस्कूल रिंग रोडने मनपा टेम्बईवाडी विद्या मंदिरवर ५-३ अशा दोन गुणफरकाने मात करुन तृतीय क्रमांक पटकविला.
लोकमानस न्यूज व्यवस्थापकीय संपादक स्वरूप तेली.
न्यूज व जाहिरातीसाठी संपर्क – 97 67 38 40 91. / 98 60 28 22 89.
Our Visitor
Views Last 30 days : 67
Total views : 549012