शारंग चषक ऑल इंडिया एकेरी कॅरम स्पर्धा १२ रोजीपासून

- स्पर्धा संयोजक समितीचे प्रसाद शेडे यांची माहिती - शुक्रवार दि. १२ ते रविवार दि. १४ जून २०२६ या काळात होणार स्पर्धा फोटो १० जून - नंदकुमार न्यूज फोल्डरला कॅरम स्पर्धा लोगो फोटो नावाने सेव्ह आहे

कोल्हापूर : लोकमानस न्यूज – निखिल तेली.

राजोपाध्येनगर येथील बॅडमिंटन हॉलमध्ये कै. वसंतराव जयवंतराव देशमुख यांच्या स्मरणार्थ शारग चषक ऑल इंडिया एकेरी कॅरम स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धा शुक्रवार दि. १२ ते रविवार दि. १४ जून २०२६ या काळात होणार आहेत. अशी माहिती स्पर्धा संयोजक समितीचे प्रसाद शेडे यांनी पत्रकार परिषदेत दिली. या पत्रकार परिषदेला सुरज देशमुख, सिध्दार्थ देशमुख स्पर्धा समिती अध्यक्ष दिपक बराले, गौरव हुदले, संदीप पाेवार, अख्तर शेख, संग्राम शिंदे, किरण पाटील आदी उपस्थित होते.


स्पर्धेचे खास आकर्षण
या स्पर्धेत देशाच्या कानाकोपऱ्यातून सुमारे २५० पेक्षा अधिक नामवंत खेळाडूंनी सहभाग नोंदवला आहे. या स्पर्धेचे खास आकर्षण म्हणजे या स्पर्धेमध्ये तीन माजी विश्वविजेते, दोन आशियाई विजेते, चार जूनियर चॅम्पियनशिप जिंकणारे १७ वर्षाखालील खेळाडू तसेच दहा महिला खेळाडूंचा सहभाग लक्षणिय असणार आहे.
स्पर्धेत विजेत्यांना रोख रक्कम व शारंग चषक
या स्पर्धा सर्व कॅरमप्रेमी, खेळाडूंनी आयोजीत केल्या आहेत. या स्पर्धेला शिवसेनेचे दक्षिण विधानसभा प्रमुख, शिवसेनेचे गटनेते नगरसेवक शारंगधर देशमुख यांच्या माध्यमातून मोलाचे सहकार्य लाभले आहे. या स्पर्धेतील विजेत्या खेळाडूला रोख ७५ हजार रुपये, उपविजेत्या खेळाडूस रोख ५० हजार रुपये, तृतीय क्रमांकाच्या खेळाडूला रोख २५ हजार रुपये तर चतुर्थ क्रमांकाच्या खेळाडूला रोख १५ हजार रुपये व शारंग चषक देउन गौरविण्यात येणार आहे तसेच ५ ते १६ क्रमांक पटकावणाऱ्या खेळाडूंसाठी रोख बक्षीसासह आकर्षक पारितोषिके देण्यात येणार आहेत.
माजी विश्वविजेते, नामवंत खेळाडूंचा पाहता येणार खेळ
या स्पर्धेमध्ये माजी विश्वविजेते योगेश परदेशी, संदीप दिवे, रियाज अकबरअली यांच्यासह कोल्हापुरातील नामवंत खेळाडू व विश्वचषक स्पर्धेतील क्रमांक तीन ठरलेला कोल्हापूरचा कॅरम खेळाडू अभिजीत तिरपणकर, आशियाई विजेते प्रकाश गायकवाड, राष्ट्रीय विजेते संजय मांडे आदींसह अनेक दिग्गज खेळाडूंच्या खेळाची झलक कोल्हापूरकरांना पाहता येणार आहे. या स्पर्धेच्या उद्घाटनावेळी महापौर, उपमहापौर, महायुतीचे सर्व मनपा पदाधिकारी, नगरसेवक उपस्थित राहणार आहेत. तरी कोल्हापुरातील तमाम कॅरम प्रेमींनी व क्रीडा रसिकांनी या स्पर्धा पाहण्याचा आनंद घ्यावा, असे आवाहन स्पर्धा संयोजकांनी केले आहे.

Our Visitor

5 4 8 4 3 0
Views Last 30 days : 367
Total views : 548648

You may also like

error: Content is protected !!