कोल्हापूर : लोकमानस न्यूज
मनसे वाहतूक सेनेतर्फे संस्थापक अध्यक्ष राज ठाकरे व बाळा नांदगांवकर यांच्या वाढदिवसानिमित्त छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे शुक्रवार दि.१२ जून रोजी सकाळी ११.४५ वा. शालेय साहित्य व जीवनावश्यक वस्तूंचे वाटप उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे., अशी माहिती मनसे वाहतूक सेनेचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष राजू जाधव यांनी पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी मनसेचे राजू जाधव म्हणाले, गेल्या १३ वर्षांपासून सातत्य राखत महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेतर्फे राज ठाकरे व बाळा नांदगावकर यांच्या वाढदिवसानिमित्त शहरातील गोरगरीब कुटुंबांना शालेय शिक्षण साहित्य तसेच जीवनावश्यक वस्तू यांचे वाटप उपक्रम राबविण्यात येत आहे.
पुढे ते म्हणाले, मुंबईतुन राज ठाकरे यांनी दिलेल्या आदेशानुसार राबविण्यात येणाऱ्या उपक्रमाचे यंदाचे हे १४ वे वर्ष आहे वाढदिवसासाठी लाखो रुपयांचा खर्च करण्यापेक्षा गोरगरीब गरजू विद्यार्थी, नागरीक तसेच अंधशाळेतील विद्यार्थ्यांना मदतीचा हात देण्याचे विधायक कार्य या माध्यमातून घडत असल्यामुळे यापुढेही हा उपक्रम सुरुच ठेवणार असल्याचेही यावेळी त्यांनी सांगितले.
या पत्रकार परिषदेला शहर उपाध्यक्ष अण्णा तिळवे, विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष अभिजीत राऊत, राधानगरी तालुका अध्यक्ष राहुल कुंभार, विभाग अध्यक्ष अतुल भालकर, विद्यार्थी सेना शहराध्यक्ष अजिंक्य शिंदे आदी उपस्थित हाेते.
Our Visitor
Views Last 30 days : 367
Total views : 548648