– पाच ते सहा तास चालली शस्त्रक्रिया
– वैद्यकीय अधिकारी, डॉक्टर व सिस्टर्स या योगदानामुळे रुग्णाला मिळाले जीवदान
कोल्हापूर : लोकमानस न्यूज / विशेष प्रतिनिधी स्वरूप तेली.
अत्यंत गुंतागुंतीची अन्युरिझमची शस्त्रक्रिया यशस्वी केल्याने 55 वर्षीय महिलेला जीवदान मिळाले. तसेच
पाच ते सहा तास चालेल्या या शस्त्रक्रियेत वैद्यकीय अधिकारी, डॉक्टर व सिस्टर्स यांच्या टीमने महत्त्वपूर्ण योगदान दिले. अशी माहिती न्यूरोसर्जन डॉ. तुप्ती पवार व डॉ. निशांत गोब्बर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी बोलताना न्यूरोसर्जन डॉ. तुप्ती पवार व डॉ. निशांत गोब्बर म्हणाले, माया दिलीप गायकवाड, वय 55 वर्षे, राहणार मांगले, तालुका शिराळा, जिल्हा सांगली या रुग्ण दि. 16 जानेवारी 2026 रोजी सायंकाळी सुमारे साडेसहा वाजता सदर रुग्ण अतितीव्र डोकेदुखी व चक्कर येऊन बेशुद्ध झाल्याने तातडीने त्यांना सडोली येथील रुग्णालयात भरती करण्यात आले. त्यानंतर करण्यात आलेल्या प्राथमिक उपचारानंतर या रुग्ण शुद्धीवर आल्या.
या रुग्णाच्या मेंदूचा MRI स्कॅन केला असता त्यामध्ये त्यांच्या मेंदूमधील अन्युरिझम फुटल्याने रक्तस्राव झाल्याचे आढळले.
छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालय, कोल्हापूर येथे सदर रूग्णाला दाखल केल्यावर CT-ANGIOGRAPHY स्कॅन केले असता त्यांच्या अन्युरिझम फुटल्याच्या निदानाची पुष्टी झाली. अन्युरिझम म्हणजे मेंदूतील रक्तवाहिनी एका ठिकाणी नाजूक होऊन त्याचा फुगा होतो. अन्युरिझम म्हणजे जणू एक टाईम बॉम्बच! नेमका तो कधी फुटतो त्याचा काही नेम नाही. एकदा फुटला तर 30- 35% टक्के रुग्ण जागीच दगावतात असा हा अतिशय घातक व जीवघेणा आजार आहे.
सदर पेशंटची तातडीने शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय येथील न्यूरोसर्जन डॉ. तुप्ती पवार व डॉ. निशांत गोब्बर यांनी घेतला. मेंदूच्या अन्युरिझमची शस्त्रक्रिया म्हणजे अतिशय अवघड व गुंतागुंतीची शस्त्रक्रिया असते. या शस्त्रक्रियेसाठी HD-MICROSCOPE, MODULAR-OT तसेच MICRO SURGICAL INSTRUMENTS लागतात.
छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. सदानंद भिसे व डॉ. वसंत देशमुख, प्राध्यापक व विभागप्रमुख शल्यचिकित्साशास्त्र विभाग यांच्या प्रयत्नाने TRAUMA-ICU व NEURO- OT सज्ज करण्यात आली. न्यूरोसर्जन डॉ. तृप्ती पवार यांच्या प्रयत्नाने मायक्रो सर्जिकल इन्स्ट्रमेंट व एचडी मायक्रोस्कोप आणण्यात आले.
– पाच ते सहा तास चालली शस्त्रक्रिया
सीपीआर रुग्णालयाच्या इतिहासात पहिल्यांदाच अशी शस्त्रक्रिया होणार होती. दि. 23 जानेवारी 2026 रोजी ही गुंतागुंतीची शस्त्रक्रिया डॉ. निशांत गोब्बर यांनी न्यूरोसर्जन डॉ. अनिल जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरित्या पार पाडली. सदरची शस्त्रक्रिया ही जवळजवळ पाच ते सहा तास चालली.
सदर शस्त्रक्रियेमद्धे भुलतज्ञ विभागाचे विभागप्रमुख डॉ. उल्हास मिसाळ व भुलतज्ञ डॉ. धनंजय मुळीक तसेच इतर भुलशास्त्र विभागाचे निवासी डॉक्टर डॉ. शुभाली डुंबरे, डॉ. श्रेया सुवर्णा व डॉ. वैष्णवी नायर यांची भूमिका मोलाची ठरली. या शस्त्रक्रिया प्रक्रियेमद्धे शस्त्रक्रियागाराच्या प्रमुख सिस्टर शितल दळवी, ब्रदर विनायक चौगुले, ब्रदर प्रवीण शिंदे व टीम यांचा सहभाग होता.
शस्त्रक्रियेनंतर सदर रुग्णाला ट्रॉमा आयसीयूमध्ये निगराणीसाठी ठेवण्यात आले. त्यानंतर दि: 24 जानेवारी 2026 रोजी सदर रुग्णाने डोळे उघडून प्रतिसाद दिला. रुग्णाच्या प्रकृतीमद्धे आणि थोडी सुधारणा झाल्यानंतर सदर रुग्णाला व्हेंटिलेटर वरून बाहेर काढण्यात आले.
– रुग्णाची प्रकृती आता स्थिर
सदर रुग्णाची प्रकृती आता स्थिर असून त्या रुग्ण आता व्यवस्थित बोलतात तसेच स्वता:हून आपले जेवणही करत आहेत. अशाप्रकारे सदर रुग्णाच्या प्रकृतीमद्धे अतिशय चांगल्या प्रकारे सुधारणा झालेली आहे.
– यांचे योगदान ठरले महत्त्वाचे
या सर्व प्रक्रियेमद्धे रुग्णाची आयसीयूमध्ये काळजी घेत असताना ट्रॉमा-आयसीयुच्या प्रमुख सिस्टर मीनाक्षी पाटील, सिस्टर सारिका व्हनमुट्टे यांचे योगदान महत्त्वाचे ठरले.
तसेच सदर शस्त्रक्रिया ही अधिष्ठाता डॉ. एस.एस. भिसे, वैद्यकीय अधिक्षक डॉ. भूषण मिरजे, शल्यचिकित्साशास्त्र विभागाचे विभागप्रमुख व प्राध्यापक डॉ. वसंत देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. तसेच निवासी अधिकारी डॉ. ऋषिकेश बंडगर व डॉ. नेहा रहांगदळे यांचेही योगदान मोलाचे ठरले.
Our Visitor
Views Last 30 days : 142
Total views : 548118