दिव्यांग विद्यार्थ्यांनी दिवाळी निमित्त तयार केल्या “टाकाऊ पासून टिकाऊ वस्तू”

- जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस. यांच्या हस्ते प्रदर्शन व विक्री स्टॉलचे उदघाटन

 

फोटो ओळ : समाज कल्याण विभागाच्या अंतर्गत चालविल्या जाणाऱ्या दिव्यांगांच्या विशेष शाळेतील दिव्यांग विद्यार्थ्यानी दिवाळी निमित्त बनवलेल्या विविध वस्तुंचे प्रदर्शन व विक्री स्टॉलचे उदघाटन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस यांचे हस्ते संपन्न झाले.

दिव्यांग विद्यार्थ्यांनी दिवाळी निमित्त तयार केल्या “टाकाऊ पासून टिकाऊ वस्तू”

– जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस. यांच्या हस्ते प्रदर्शन व विक्री स्टॉलचे उदघाटन

कोल्हापूर, दि.24 : ( “लोकमानस न्यूज 4” – विशेष प्रतिनिधी नंदकुमार तेली)

समाज कल्याण विभागा अंतर्गत चालविणाऱ्या दिव्यांगांच्या विशेष शाळेतील दिव्यांग विद्यार्थ्यांनी दिवाळी निमित्त “टाकाऊ पासून टिकाऊ वस्तू” तयार केल्या आहेत. या तयार करण्यात आलेल्या विविध वस्तूंचे प्रदर्शन व विक्री स्टॉलचे उदघाटन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस. यांच्या हस्ते झाले.

यांची होती प्रमुख  उपस्थिती

जिल्हा परिषदेत लावण्यात आलेल्या या प्रदर्शनाच्या उद्घाटन कार्यक्रमास जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक सुषमा देसाई, शिक्षणाधिकारी (प्राथ.) मीना शेंडकर, जिल्हा समाज कल्याण अधिकारी संभाजी पोवार, वैद्यकीय सामाजिक कार्यकर्त्या साधना कांबळे तसेच दिव्यांग शाळेतील मुख्याधापक उपस्थित होते.

या शाळांनी घेतला प्रदर्शनात सहभाग

यामध्ये रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी डेफ स्कूल, तिळवणी, वि.म. लोहिया मुकबधिर विद्यालय, कोल्हापूर, कर्णबधिर विद्यालय, पेठवडगांव, निवासी मुकबधिर विद्यालय गडहिंगलज, चेतना विकास मंदिर कोल्हापूर, स्वयम मतिमंद मुलांची शाळा, अवधुत विशेष मुलांची निवासी शाळा, अंबप, स्व.गणपतराव गाताडे मतिमंद विद्यालय, कागल, कर्णबधिर विद्यालय शिरोळ, सन्मती मतिमंद विकास केंद्र, इचलकरंजी, जिज्ञासा विकास मंदिर, कोल्हापूर आदी शाळांनी या प्रदर्शनात सहभाग घेतल्याची माहिती जिल्हा समाज कल्याण अधिकारी संभाजी पोवार यांनी दिली आहे.

Our Visitor

5 4 8 0 5 4
Views Last 30 days : 136
Total views : 548111

You may also like

error: Content is protected !!