महाराष्ट्र, न्यू इंग्लिश,छ. शाहू, शांतिनिकेतन उपांत्य फेरीत

महानगरपालिकास्तरीय सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल स्पर्धा

महाराष्ट्र, न्यू इंग्लिश,छ. शाहू, शांतिनिकेतन उपांत्य फेरीत

– कोल्हापूर महानगरपालिका व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आयोजित महानगरपालिकास्तरीय सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल स्पर्धा

– आज 14 वर्ष मुले अंतिम सामना.

– आजपासूनच 17 वर्ष मुले सामन्यांना प्रारंभ

कोल्हापूर : (मानस न्यूज 9 – विशेष प्रतिनिधी नंदकुमार तेली).

कोल्हापूर महानगरपालिका कोल्हापूर व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित महानगरपालिका स्तरीय सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल स्पर्धा छत्रपती संभाजी महाराज विभागीय क्रीडा संकुल येथे सुरू आहेत. शुक्रवारी झालेल्या सामन्यांमध्ये महाराष्ट्र, न्यू इंग्लिश,छ. शाहू,शांतिनिकेतन या चार संघांनी प्रतिस्पर्धी संघांवर मात करून उपांत्य फेरीत प्रवेश केला.

शुक्रवार दि. 21 जुलै 2023 रोजी झालेल्या सामन्यांचा सविस्तर निकाल पुढील प्रमाणे….

१४ वर्ष मुले….

पहिल्या सामन्यात महाराष्ट्र हायस्कूल संघाने व ज देशमुख इंग्लिश स्कूल संघावर 6-0 गोलने एकतर्फी मात केली. महाराष्ट्र हायस्कूलकडून सम्राट मोरबाळे 3, अर्णव शिंदे 2, हर्षवर्धन पाटील 1 गोल करून संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.

दुसऱ्या सामन्यात भाई माधवराव बागल हायस्कूलने आर्यव्रीन ख्रिश्चन हायस्कूलवर 2-0 गोलने विजय मिळवला. भाई माधवराव बागलकडुन वेदांत हळदीकर व इकलास बागवान यांनी प्रत्येकी 1 गोल केला.

तिसऱ्या सामन्यात न्यू इंग्लिश मीडियम स्कूल संभाजीनगर विरुद्ध भारतीय विद्यापीठ इंग्लिश स्कूल यांच्यातील सामना पूर्णवेळ गोलशून्य बरोबरीत राहिला. न्यू इंग्लिश मिडीयम स्कूलने सडनदेथवर विजय संपादन केला.

चौथ्या सामन्यात नागोजीराव पाटणकर हायस्कूल विरुद्ध न्यू हायस्कूल यांच्यातील सामनाही पूर्णवेळ गोलशून्य बरोबरीत राहिला. ट्रायब्रेकरवर नागोजीराव पाटणकर हायस्कूलने सामना
3-1 गोलने जिंकला.

चार उपांत्यपूर्व सामन्यांचा सविस्तर निकाल असा…

पाचव्यापहिल्या उपांत्यपूर्व सामन्यात महाराष्ट्र हायस्कूलने भाई माधवराव बागल हायस्कूलसंघावर 8-0 गोलने एकतर्फी विजय मिळवला. महाराष्ट्र हायस्कूलकडून साईराज पाटील 3, सम्राट मोरबाळे 2, पृथ्वीराज साळोखे 2, प्रतिक इंगवले 1 गोल करून संघाला मोठा विजय मिळवून दिला.

सहाव्यादुसऱ्या उपांत्यपूर्व सामन्यात न्यू इंग्लिश मिडीयम स्कूल, संभाजीनगरने नागोजिराव पाटणकर हायस्कूलवर 1-0 गोलने विजय मिळवला. न्यू इंग्लिश मिडियम स्कूलकडून शौर्य मंडलिकने एकमेव विजयी गोल करून संघाच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला.

सातव्यातिसऱ्या उपांत्यपूर्व सामन्यात शांतिनिकेतन स्कूलने छ शाहू विद्यालय सीबीएसईवर 3-0 गोलने एकतर्फी मात केली. शांतिनिकेतनकडून अर्षित खरात, साद मुल्ला, रक्षित ओसवाल यांनी प्रत्येकी 1 गोल करून संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.

आठव्याचौथ्या उपांत्यपूर्व सामन्यात छ. शाहू विद्यालय एसएससीने महावीर इंग्लिश स्कूलवर 3-0 गोलने सहज विजय मिळवला. शाहूकडून वेदांत गाडगीळ, सादिक मुल्ला, हर्षवर्धन इंजर यांनी प्रत्येकी 1 गोल करून संघाच्या विजयात महत्वपूर्ण योगदान दिले. वरील चारही विजयी संघांनी स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक मारली.

आज शनिवारी 22 जुलै 2023 रोजी होणारे सामने….

14 वर्षे मुले

सेमी फायनल 1 : महाराष्ट्र हायस्कूल विरुद्ध न्यू इंग्लिश स्कूल, संभाजीनगर.

सेमी फायनल 2 : छ शाहू विद्यालय एस एस सी विरुद्ध शांतिनिकेतन स्कूल.

– 14 वर्ष मुले अंतिम सामना.

– आजपासूनच 17 वर्ष मुले सामन्यांना प्रारंभ.

Our Visitor

5 4 8 0 5 4
Views Last 30 days : 136
Total views : 548111

You may also like

error: Content is protected !!